Jalna crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna crime News : धक्कादायक..अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मारहाण; जालन्यातील चंदनझिरा भागात मध्यरात्रीची घटना

Jalna News : जालन्यातील चंदनझिरा भागामध्ये ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: राज्यात सातत्याने मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच जालन्यातील चंदनझिरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यात एका ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   

जालन्यातील (Jalna) चंदनझिरा भागामध्ये ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. हि घटना १३ ओक्टोम्बरच्या रात्री घडली. मुलीला मारहाण करून तिला रस्त्याच्या बाजूला फेकून दिले. संशयीत आरोपींनी चिमुकलीवर अत्याचार आणि मारहाण केल्यानंतर तिला रस्त्यावर फेकून दिल्याची देखील माहिती समोर येत आहे. (Crime News) अत्याचार आणि मारहाणीनंतर चिमुकली बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याची देखील माहिती समोर आली आहे.

मुलगी या घटनेत बेशुद्ध झाल्याने तिचा शोध लागल्यानंतर तिला उपचारासाठी दाखल केल्यावर सदर घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी ५ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून अज्ञात आरोपी विरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास चंदनझिरा पोलीस करत आहे. दरम्यान चिमुकलीची  प्रकृती सध्या स्थिर असून तिला पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT