Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: धक्‍कादायक..गळ्यावर वार करून चिमुरडीची हत्‍या; चुलत बहिणीवर संशय

धक्‍कादायक..गळ्यावर वार करून चिमुरडीची हत्‍या; चुलत बहिणीवर संशय

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. काकांकडे शिक्षणासाठी आलेल्या चिमुरडीचा गळ्यावर चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या (Crime News) करण्यात आली आहे. १३ वर्षाच्या चुलत बहिणीवर हत्या केल्याचा संशय आहे. (Live Marathi News)

घनसावंगी तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेली ईश्वरी या आठ वर्षीय इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीची गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. जालना (Jalna) शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

बाथरूममध्‍ये होती पडलेली

ईश्वरी हिचे काका हे व्यवसाय करतात. मुलांच्या शिक्षणासाठी ते जालना शहरात राहतात. आज सकाळी ईश्वरी त्यांच्या घराच्या बाधरूममध्ये रक्ताचा थारोळ्यात आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यु झाल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

चुलत बहिणीवर संशय

ईश्वरी हिची १३ वर्षाच्या चुलत बहिणीसोबत सतत वाद होत असल्याने त्या वादातून ईश्वरीच्या बहिणींनीच तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी तालुका पोलिस अधिक तपास करत आहे. हत्येच्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plank Benefits: खरचं वजन कमी करायचं आहे? मग सुरुवात करा 'या' व्यायामाने, मिळेल पॉझिटिव्ह बदल

Parenting Alert : लहान मुलांच्या घशात काही अडकलं तर सर्वात आधी काय करावे? प्रत्येक पालकाला माहित असाव्यात 'या' २ महत्त्वाच्या गोष्टी

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

SCROLL FOR NEXT