Jalna Crime 
महाराष्ट्र

जालन्यात चक्क मास्क घालून चोरट्यांचा फ्लिप कार्डच्या ऑफिसवर डल्ला; घटना CCTVत कैद

सदरील घटा सोमवारी सकाळी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : गेल्या काही दिवसांपासून जालना (Jalna) शहरासह परिसरात चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. बंद असलेल्या घरावर तसेच दुकानावर नजर ठेवून चोरटे सर्रास चोरी करत आहेत. या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलीस (Police) प्रशासनासमोर उभं राहिलं आहे. अशातच, जालना शहरातील अंबड चौफुली भागात असलेल्या ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या फ्लिप कार्डच्या कार्यालयावर दोन चोरट्यानी डल्ला मारल्याची घटना सोमवारी सकाळी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे. (Jalna Crime News)

सोमवारी सकाळी 10 वाजता कार्यालय उघडल्यावर कार्यालयात चोरी झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज चेक केल्यानंतर कार्यालयाच्या आत दोन मास्क लावलेल्या चोरट्याने प्रवेश करत ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या साहित्याचे बॉक्स लंपास केले. कार्यालयाचे शटर्स टामीच्या साह्याने तोडून या दोन चोरट्यांनी तब्बल 5 लाख 87 हजाराच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे.

चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. यामुळे ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या फ्लिप कार्ड कंपनीला 5 लाख 87 हजार रुपयांचा भुदंड बसला आहे. या प्रकरणी फ्लिप कार्ड कार्यालयाच्या व्यवस्थापकाच्या तक्रारी वरून तालुका जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT