Jalna Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime : कापूस विक्री करून आलेल्या शेतकऱ्याला लुटले; जालन्यात लुटमार करणारी टोळी जेरबंद

Jalna News : शेतकरी आपला कापूस विकून दीड लाख रुपये रोकड घेऊन गावाकडे होता. मात्र पाठलाग सुरु सुमसाम असलेल्या रस्त्यावर मोटरसायकलवर पाठीमागून आलेल्या चार जणांनी या शेतकऱ्याला अडविले

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: जालन्यात कापूस विक्री करून आलेल्या एका शेतकऱ्याला दीड लाख रुपयांना लुटल्याची घटना जालन्यातील शिंगाडे पोखरी फाट्याजवळ घडली होती. हातातील बॅग घेऊन काहीजण पसार झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत शेतकऱ्याला लुटणाऱ्या टोळीच्या मौजपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. 

जालन्यातील वखारी येथील एक शेतकरी आपला कापूस विकून दीड लाख रुपये रोकड घेऊन गावाकडे  होता. मात्र त्यांच्यावर नजर ठेवून त्यांचा पाठलाग सुरु सुमसाम असलेल्या रस्त्यावर मोटरसायकलवर पाठीमागून आलेल्या चार जणांनी या शेतकऱ्याला अडविले. यानंतर शेतकऱ्याजवळ असलेली बॅग हिसकावून दीड लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. 

चार जण ताब्यात 

घडलेल्या घटनेने घाबरलेल्या शेतकऱ्याने मौजपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान शेतकऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर मौजपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यात चार आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. यामध्ये कृष्णा शिंदे, विठ्ठल पास्टे, अनिकेत खरात, गजानन झाडे असे संशयित आरोपीचे नाव असून त्यांना मौजपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास मौजपूरी पोलीस करत आहे.

९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 
शेतकऱ्याचे दीड लाख रुपये चोरून नेल्याप्रकरणी चार आरोपींना मौजपुरी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. संशयित आरोपींकडून वाहनांसह एकूण नऊ लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अधिक तपास जालन्यातील मौजपुरी पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळी एस्टन एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये जनरेटरला आग

Kitchen Hacks : जळलेला नॉन स्टिक तवा कसा साफ करावा? फॉलो करा या टिप्स, पुन्हा मिळेल नव्यासारखी चमक

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT