Jalna Crime News Saam TV
महाराष्ट्र

Jalna Crime : जालन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल १४ लाखांचा गांजा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जालना जिल्ह्यात कारवाईचा धडाका लावला आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जालना (Jalna) जिल्ह्यात कारवाईचा धडाका लावला आहे. बुधवारी जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा गावात धाड टाकून तब्बल १४ लाख ६१ हजारांच्या गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकाला ताब्यात देखील घेण्यात आलं. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात ही तिसरी कारवाई असल्यानं गांजा तस्करीचे मोठं रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  (Latest Marathi News)

गेल्या ८ दिवसात पोलिसांनी अवैधरित्या शेतात लावण्यात आलेल्या २८ लाखांच्या गांजा पिकांच्या जप्तीची कारवाई केली. अस असतानाच, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा गावात धाड टाकून तब्बल १४ लाख ६१ हजार रुपये किंमतीची ६९ गांजाची झाड जप्त केली आहे.

जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात अवैधरित्या (Crime News) गांजाच्या पिकांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकांनी निवडुंगा गावातील शेतकऱ्याच्या शेतात धाड टाकली. यावेळी उत्पादन शुल्काच्या पथकाने शेतात अडगळीच्या ठिकाणी लावण्यात आलेले ६९ गांजाची झाड शोधून काढली.

जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत बाजार भावा प्रमाणे अंदाजे किंमत १४ लाख ६१ हजार रुपये असल्याचा अंदाज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी वर्तविला आहे. पथकांनी कारवाई दरम्यान एकाला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात अंमलीपदार्थाची लागवड केल्याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात ही तिसरी कारवाई असल्यानं जिल्ह्यत गांजा तस्करीचे मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ अक्षय शिंदे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! जुनी पेन्शन संदर्भात मोठा निर्णय, कुणाला होणार लागू? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

SCROLL FOR NEXT