Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: बेपत्‍ता युवकाचा मृतदेह आढळला तलावात; घातपाताचा संशय

बेपत्‍ता युवकाचा मृतदेह आढळला तलावात; घातपाताचा संशय

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यात चार दिवसांपासून बेपत्‍ता असलेल्‍या युवकाचा मृतदेह तलावात आढळून आला आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातल्या लालवाडी शिवारातील ही घटना घडली असून या प्रकरणात दोन संशयितांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

अंबड तालुक्यातील लालवाडी शिवारातील तलाव परिसरात ही घटना घडली आहे. योगेश भुजंगराव सुळसुळे असे खून (Crime News) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो चार दिवसांपासून तो बेपत्ता असल्याची तक्रार अंबड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडून त्यांचा शोध घेऊनही शोध लागत नसल्याने पोलिस याप्रकरणी कसून चौकशी करत होते. या दरम्‍यान आज लालवाडी शिवारात असलेल्या तलावात त्याचा मृत्यदेह आढळून आला.

दोन संशयीत ताब्‍यात

पोलिसांनी यात घातपाताचा संशय व्यक्त करत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नातेवाईकांच्या संशयावरून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून ज्ञानेश्वर किसन शिंदे आणि रामप्रसाद शिंदे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी अंबड पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंचा मुंबईत कारवाईचा धडाका; FDA कडून २,५१० लिटर सॉस, ११.१९ लाखांचे एनर्जी ड्रिंक जप्त, व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

Loose Motion : उलट्या- जुलाब होतायत? चुकूनही खाऊ नका 'हा' पदार्थ, अन्यथा...

Skin care: दररोज सनस्क्रीन लावूनही चेहऱ्यावर टॅनिंग होत आहे? त्वचारोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या याचे 5 कारण

दारू पार्टीत नको ते घडलं; मित्रांनी प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा, तरुण थेट ICU मध्ये

खासदारांची फोडाफाडी का होतेय? माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पडद्यामागील राजकारण

SCROLL FOR NEXT