Jalna Crime News Saam Tv
महाराष्ट्र

फोन-पे वरून घेतली लाच; जालन्यातील दोन तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Jalna Crime : अक्षय भुरेवाल आणि मंगेश लोखंडे अशी या तलाठ्यांची नावे आहेत.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : आजकाल पैशांसाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. चांगली नोकरी असून सुद्धा काहीजण पैशांसाठी आपला स्वाभिमान विकून टाकतात. अशीच एक घटना जालना (Jalna) जिल्ह्यातील मंठा तालुक्यातून समोर आली आहे. मंठा (Mantha) तालुक्यात फोन-पे च्या माध्यमातून 30 हजारांची लाच घेताना दोन तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडलं आहे. अक्षय भुरेवाल आणि मंगेश लोखंडे अशी या तलाठ्यांची नावे आहेत. (Jalna Latest Crime News)

प्रसिद्ध गायक केके यांचे निधन; लाइव्ह कॉन्सर्टनंतर खाली कोसळलेमाहितीनुसार, मंठा तालुक्यातील उमखेड येथील तलाठी अक्षय भुरेवाल आणि मंगरूळ येथील मंगेश लोखंडे यांनी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. यावेळी तक्रारदाराने वाळू वाहतूक करण्याची रितसर पावती (रॉयल्टी) तलाठ्यांना दाखवली होती. मात्र या पावतीवर खाडाखोड आहे, ही पावती चालत नाही असं सांगत 50 हजारांचा दंड भर नाहीतर, तुझ्यावर कारवाई करावी लागेल, असा दम या दोन्ही तलाठ्यांनी तक्रारदाराला दिला.

इतकंच नाही तर तडजोड करायची असेल तर, 30 हजार रुपये दे अशी मागणी दोन्ही तलाठ्यांनी तक्रारदाराकडे केली. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने दोन्ही तलाठ्यांनी तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली. दरम्यान, लाच घेण्याची तक्रार प्राप्त होताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत मंगळवारी (31 मे) तलाठी अक्षय भुरेवाल आणि मंगेश लोखंडे यांना रंगेहाथ पकडले.

दोन्ही तलाठ्यांनी फोन पे च्या माध्यमातून तक्रारदाराकडून लाच स्वीकारली होती. दरम्यान या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात दोन्ही तलाठ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लाचलुचपत प्रीतिबंधक विभागाचे पोलिस करत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

SCROLL FOR NEXT