Jalna News Saamtv
महाराष्ट्र

Jalna Crime: विहिरीच्या पाण्याचा वाद जिवावर बेतला, चुलत भावानेच भावाला संपवले; जालन्यात खळबळ!

Jalna News: चुलत भावाने मौजपूरी येथे येऊन तीन भावांच्या मदतीने योगेश डोंगरे यास बेदम मारहाण करून त्याचा खून केला.

लक्ष्मण सोळुंके

Jalna Crime News:

शेतातील सामुहिक विहिरीच्या पाण्याच्या वाटणीवरून चुलत भावाने 25 वर्षीय चुलत भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना तालूक्यातील मौजपूरी गावात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना तालुक्यातील (Jalna) मौजपुरी गावात चुलत भावांमध्ये विहिरीच्या पाण्यावरून वाद झाला होता. हा वाद गावकऱ्यांनी मध्यस्थी करून मिटवला होता. मात्र रात्री उशीरा बाहेर गावी राहत असलेल्या चुलत भावाने मौजपूरी येथे येऊन तीन भावांच्या मदतीने योगेश डोंगरे यास बेदम मारहाण करून त्याचा खून केला.

या मारहाणीत योगेशची पत्नी शिल्पा ही गंभीर जखमी झाली .घटनेची माहिती कळताच परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्यासह सपोनि. मिथुन घुगे, उपनिरीक्षक राकेश नेटके आदींनी फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी भेट देत मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

याप्रकरणी मृत तरुणाचे वडील बाबासाहेब डोंगरे यांच्या फिर्यादीवरून सावळाराम डोंगरे, पंडित डोंगरे, रामेश्वर डोंगरे, पवन टोम्पे, नानीबाई डोंगरे, कविता डोंगरे, आसाराम डोंगरे, या 7 जणांविरुद्ध गुन्हा निर्घृण खून केल्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणात 5 जणांना अटक केली असून दोन फरार आरोपींचा सध्या शोध सुरू आहे. या घटनेने मौजपुरी गावासह जालना जिल्ह्यात एकच खबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात राष्ट्रवादीच्या २ बड्या नेत्यांविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Banana : केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, वर्कआऊटपूर्वी की रात्रीच्या जेवणानंतर?

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

SCROLL FOR NEXT