Jalna Railway Shocking News Saam TV
महाराष्ट्र

Jalna News: जीव देण्यासाठी तरुण थेट रुळावर उभा राहिला, समोरून भरधाव ट्रेन आली अन्... जालन्यातील धक्कादायक VIDEO

Jalna Railway News: रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या उड्डाण पुलाखाली एक तरुण आपला जीव देण्यासाठी थेट रेल्वे ट्रॅकवर उभा राहिला.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Jalna News Today: जालना शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या उड्डाण पुलाखाली एक तरुण आपला जीव देण्यासाठी थेट रेल्वे ट्रॅकवर उभा राहिला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात ट्रेन येत होती. दरम्यान, लोको पायलटला रुळावर तरुण उभा असल्याचं दिसताच त्याने दोन ते तीन वेळा हॉर्न वाजवले.

मात्र, तरी सुद्धा हा तरुण रेल्वे ट्रॅकवरून (Railway track) बाजूला होत नसल्याने अखेर लोको पायलटने ट्रेन थांबवली. ट्रेन थांबवताच या तरुणाने येऊ दे... येऊ दे... असं म्हणत आरडाओरड सुरू केली. बराच वेळ होऊन सुद्धा तरुण रुळावरून बाजूला होत नसल्याने कंटाळून लोको पायलट खाली उतरला.

त्याने या तरुणाची समजूत काढत त्याला बाजूला जाण्याची विनंती केली. अखेर तरुण रुळावरून बाजूला झाला. हा संपूर्ण प्रकार परिसरातील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे.

दरम्यान, रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत हा तरुण घटनास्थळावरून निघून गेल्याने त्याची माहिती मिळू शकली नाही. सध्या मोबाईल व्हिडीओच्या आधारे रेल्वे पोलिस या तरुणाचा शोध घेत आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT