जालन्यात शिवसैनिकांकडून रस्त्याच्या बोगस कामाची पोलखोल! SaamTVnews
महाराष्ट्र

जालन्यात शिवसैनिकांकडून रस्त्याच्या बोगस कामाची पोलखोल! पहा Video

यवतमाळ प्रमाणेच जालन्यात देखील बोगस रस्त्याचं च काम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : यवतमाळ प्रमाणेच जालन्यात देखील बोगस रस्त्याचं च काम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी ते शहागड ह्या रस्त्याच्या (Road) डांबरीकरणाचे काम सुरु आहे. तन्वी कन्ट्रक्शन च्या वतीने डांबरीकरणाचे हे काम सुरू आहे.

मात्र, हे डांबरीकरण ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. रोडवर खडी आणि डांबराचा इतका कमी थर टाकण्यात आलाय कि, हा रास्ता चक्क हाताने उखडून येत असल्याने संपूर्ण बोगस कामाची पोलखोल शिवसेना (Shivsena) तालुकाप्रमुख उद्धव मरकड व पंचायत समिती सदस्य रमेश बाेबडे यांनी केलेली आहे. त्यांनी स्वतः रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी कामाची पाहणी करून हे काम कसे निकृष्ट दर्जाचे आहे हे व्हिडिओच्या (video) माध्यमातून दाखवून दिले आहे.

हाताने तयार झालेला डांबरी रस्ता उकरून दाखवत या रस्त्याची संपूर्ण पोलखोल उघडी केलीय. या पुढे शिवसेना या बोगस रस्त्याचे काम खपवून घेणार नसल्याचं म्हणत या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी केलीय. जो पर्यंत या बोगस काम करणाऱ्या तन्वी कन्ट्रक्शन या कंपनीवर कारवाई केली जात नाही तो पर्यंत या रस्त्याचं काम होऊ देणार नसल्याची भूमिका मरकड व बोबडे यांनी घेतली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

Property Registration : महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस! अवघ्या ५ महिन्यांत कमावले हजारो कोटी

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

SCROLL FOR NEXT