Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : अंबड शहरात ओबीसी समाजाचा महामोर्चा; मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध

अंबड शहरात ओबीसी समाजाचा महामोर्चा; मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध

लक्ष्मण सोळुंके

जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा विचार सरकार करत आहे. याला सकल (Jalna) ओबीसी समाजाचा विरोध असून या विरोधात आज ओबीसी समाजाच्यावतीने अंबड (Ambad) शहरात विराट महामोर्चा काढण्यात आला. (Latest Marathi News)

जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरात आज सकल ओबीसी समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला. मराठा समाज हा मागास नसून या आधी सुप्रिम कोर्टानं त्यांचे आरक्षण रद्द केले आहे. मात्र तरीही सरकार त्यांना कुणबी प्रमाणपत्र देवू पाहत आहे. (Maratha Aarkshan) त्यामुळे सुप्रिम कोर्टाचा अवमान सरकारने करून नये आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये. यासह ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी; या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाची सांगता करण्यात आली. दरम्यान या मोर्चाला हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT