Jalna truck bike accident Saam Tv News
महाराष्ट्र

Jalna Accident : खासगी कामानिमित्त बाहेर पडले, ट्रक अन् दुचाकीच्या अपघातात दोन जिवलगांचा अंत; अख्ख्या गावाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा

Jalna Accident News : अशोक गायकवाड आणि तुळशीदास ढगे अशी मयत तरुणांची नावं आहेत. या अपघातात मृत झालेले दोघंही जालना शहराच्या जवळ असलेल्या शिरसवाडी गावचे रहिवाशी असून ते एका खासगी कामानिमित्त रात्री जालना शहरात आले होते.

Prashant Patil

जालना : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. बऱ्याच जणांचा यात मृत्यू देखील होत आहे. असाच एक भीषण अपघात जालन्यात दोन मित्रांचा झाला आहे. या भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं जालना शहर हळहळलं आहे. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरामध्ये ६ जून रोजी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये २५ वर्षीय दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अशोक गायकवाड आणि तुळशीदास ढगे अशी मयत तरुणांची नावे आहेत. या अपघातात मृत झालेले दोघंही जालना शहराच्या जवळ असलेल्या शिरसवाडी गावचे रहिवाशी असून ते एका खासगी कामानिमित्त रात्री जालना शहरात आले होते. जालना शहरातून परत गावाकडे जात असताना ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात या दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातात या दोन मित्रांचा मृत्यू झाल्यानी माहिती शिरसवाडी गावात पोहोचताच परिसरात एकच शोककळा पसरली आहे. दरम्यान, या दोन्ही मित्रांवर शिरसवाडी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दोघांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT