Sand Mafia Saam tv
महाराष्ट्र

Sand Mafia : वाळू माफियांची मुजोरी; तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Jalna News : वाळू माफियांकडून नदीतून वाळूचे उत्खनन करत तस्करी केली जात आहे. अर्थात प्रशासनाला न जुमानता वाळू माफियांची मुजोरी पाहण्यास मिळते. तर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ले करण्यात येत असल्याचे प्रकार

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : वाळू माफियांची वाढलेली मुजोरी अजूनही कमी झालेली नाही. जालना जिल्ह्यात हि मुजोरी पुन्हा एकदा पाहण्यास मिळाली असून कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून करण्यात आला. दरम्यान तहसीलदारांनी देखील ४० किलोमीटरचा पाठलाग करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई केली आहे. 

जालन्याच्या अंबड तालुक्यातील पारनेर तांडा ते कर्जत पर्यंत पाठलागाचा थरारक प्रसंग चालला आहे. दरम्यान नदीतून वाळूची वाहतूक करण्यास मनाई आहे. असे असताना देखील सर्रासपणे वाळू माफियांकडून नदीतून वाळूचे उत्खनन करत तस्करी केली जात आहे. अर्थात प्रशासनाला न जुमानता वाळू माफियांची मुजोरी पाहण्यास मिळते. तर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ले करण्यात येत असल्याचे प्रकार घडत असून जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा हा प्रकार समोर आला आहे.  

अंबड तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ 

अंबड तालुक्यात मागील काही दिवसापासून वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच असून सर्रासपणे बेकायदेशीररित्या वाळू उपसा करून अवैधरित्या वाळूची वाहतूक करत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने मागील काही दिवसापासून या विरोधात धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेत अनेक कारवाया करत ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. तर काल पुन्हा तहसीलदारांचे पथक कारवाईसाठी गेले होते. 

अंगावर ट्रॅक्टर चालविण्याचा प्रयत्न 

अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांनी अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदार यातून थोडक्यात बचावले असून जवळपास ४० किलोमीटरचा पाठलाग करत हा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. अंबड तालुक्यातील पारनेर तांडा ते कर्जत पर्यंत हा पाठलागाचा थरारक प्रसंग सुरू होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

Maharashtra News Live Update: शेत जमिनीच्या वादातून दोन गटात वाद आणि शिवीगाळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT