Jalna Accident News Tractor collides with bike; Three people died on the spot Saam TV
महाराष्ट्र

Jalna Accident News: भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकासह एकाचा जागीच मृत्यू

Jalna Accident News: ही दुर्देवी घटना छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर निरंकारी पेट्रोल पंपाजवळ घडली शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Jalna Accident News

भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये बाप-लेकासह एकाचा जागीच जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर निरंकारी पेट्रोल पंपाजवळ घडली शुक्रवारी (२० ऑक्टोबर) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

ज्ञानेश्वर साहेबराव साबळे (वय ३८ वर्ष ) युवराज ज्ञानेश्वर साबळे (वय १३ वर्ष) आत्माराम कारभारी मस्के (वय ३० वर्ष) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. मृत बदनापूर तालुक्यातील निकळक गावातील (Jalna News) रहिवासी असल्याची माहिती आहे.

एकाच गावातील तिघांचा अपघातात (Accident) मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर साबळे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते मुलगा युवराज साबळे आणि आत्माराम साबळे यांना घेऊन दुचाकीवरून गावी परतत होते.

दरम्यान, दुचाकी हे दुचाकीवरून गावी परतत होते. यावेळी जालना-संभाजीनगर रोडवरील निरंकारी पंपाजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांची दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला.

या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Abhijeet Dipke : जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशाचं क्रेडिट कोणाचं? अभिजित दीपकेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Abhijit Dipke: शिवीगाळ नक्कीच अयोग्य, पण तो गुन्हा कसा? अभिजित दीपके यांचा थेट सवाल, थेट मोदींचं दिलं उदाहरण

Heart-Brain Health : निरोगी हृदय, तल्लख मेंदू! आजपासूनच करा 'हे' सोपे उपाय, हार्ट अटॅकचा धोका टळेल

SCROLL FOR NEXT