Suicide Saam tv
महाराष्ट्र

घरात किरकोळ वाद; विवाहितेची आत्‍महत्‍या

घरात किरकोळ वाद; विवाहितेची आत्‍महत्‍या

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : घरातील किरकोळ कारणावरून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव (Jalgaon) तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgoan news Minor disputes at home suicide of a married woman)

जळगाव शहरातील वाघनगर परिसरातील जिजाऊ नगरामधील रहिवासी आशा विशाल इंगळे (वय २२) या पती विशाल, सासू, सासरे आणि दीर यांच्यासह वास्तव्याला होत्‍या. पती विशाल मिळेल ते काम करून उदरनिर्वाह भागवत होता. विशाल आणि दोन भाऊसोबत एकत्रच राहतात. दरम्‍यान शनिवारी (७ मे) सकाळी ९ वाजता घरात किरकोळ कारणावरून वाद झाला. या संतापाच्या भरात आशा इंगळे यांनी घराच्या वरच्या मजल्यावर जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली.

देरानीला दिसली गळफास घेतल्‍याच्‍या अवस्‍थेत

सदर प्रकार त्यांची देरानी मनिषा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी धाव घेवून आशाबाई यांना खाली उतरवून खासगी रूग्णालयात (Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलीस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास तालुका पोलीस कर्मचारी करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंनी टाकला मोठा डाव; 2029 साठी उमेदवार जाहीर|VIDEO

Ratnagiri Tourism : कोकणातील पावसाळी जादू! रत्नागिरीतील 'ही' ५ ठिकाणे फिरायला अजिबात विसरू नका

Maharashtra News Live Update: मॉन्सून पुण्यासह रायगड मध्ये दाखल, ४८ तासांत मुंबईत पोहचणार

'एका व्यक्तीमुळं झालं सगळं! शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर संजय पाटलांनी सांगितलं ठाकरेंची साथ सोडण्यामागचं कारण

Chanakya Niti: प्रत्येक महिलेमध्ये असायला हवेत हे 5 गुण; चाणक्यांचे विचार बदलू शकतात आयुष्य

SCROLL FOR NEXT