janabai mahajan 
महाराष्ट्र

जळगाव DCC त पाठींबा दिलेल्या माजी आमदारांचा पराभव; जनाबाई विजयी

भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

संजय महाजन

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (jdcc-bank) निवडणुकीत रावेर विविध कार्यकारी सोसायटीत माघार घेतलेल्या उमेदवार जनाबाई महाजन या एक मताने विजयी झाल्या आहेत. महाजन यांनी अरुण पाटील यांना पाठींबा दिला हाेता. तरी मतदारांनी महाजन यांचे पारडे जड केल्याने पाटील यांना पराभवास सामाेरे जावे लागले आहे. jalgoan dcc bank election result 2021

जळगाव जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. चार विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनेल विजयी झाले आहे. रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात सहकारच्या उमेदवार जनाबाई गोंड महाजन यांनी जाहीर माघार घेत अपक्ष उमेदवार माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा दिला होता. परंतु मतदारांनी जनाबाई महाजन यांनाच एका मताने विजयी केले आहे. महाजन यांना २६ तसेच पाटील यांनी २५ मते मिळाली आहेत.

अन्य दोन विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातही सहकार पॅनल विजयी झाले. यात यावल कार्यकारी सोसायटी मतदारसंघात महविकास आघडी प्रणित सहकार पॅनलचे विनोद पंडित पाटील, चोपडा विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात सहकार पॅनलचे घनश्याम अग्रवाल विजयी झाले.

भुसावळ विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात भाजपचे आमदार व अपक्ष उमेदवार संजय सावकारे विजयी झाले. भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. आमदार सावकारे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली हाेती. या ठिकाणी महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नव्हता.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

High Blood Pressure: रक्तदाब वाढण्यामागे फक्त मीठच नाही, या ६ चुका रोज करत असाल तर हृदयावर वाढतो मोठा ताण

धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

SCROLL FOR NEXT