Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : वीजचोरी प्रकरणी दंड न भरल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon News : विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाचे सहायक अभियंता पंकज विकास कांबळे यांच्यासह पथकाने २५ फेब्रुवारी २०२१ ला वीजचोरीविरुद्ध धडक मोहीम राबविली

Rajesh Sonwane

यावल (जळगाव) : वीजचोरी केल्याचे उघडकीस आल्याने महावितरणकडून दंड ठोठावण्यात आला होता. मात्र दंडाची रक्कम न भरल्याने तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील गिरडगाव येथील हे तीनजण आहेत. 

यावल (Yawal) तालुक्यातील गिरडगाव येथे किनगाव येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाचे सहायक अभियंता पंकज विकास कांबळे यांच्यासह पथकाने २५ फेब्रुवारी २०२१ ला वीजचोरीविरुद्ध धडक मोहीम राबविली होती. यामध्ये त्यांना भिका ताराचंद सोनवणे, संभाजी राघो पाटील व आत्माराम ओंकार पाटील हे तीन जण वीज चोरी (Electricity Theft) करताना आढळून आले होते. तेव्हा या तिघांनी ६७८ युनिट वीज चोरी केल्या प्रकरणी १७ हजार ९८० रुपये दंड आकारून दंड भरण्यासाठी नोटीस देण्यात आली. 

मात्र, महावितरणने नोटीस दिल्यानंतर देखील या तिघांनी वेळेत दंड भरला नाही. यामुले वीजचोरी प्रकरणी तिघांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात पंकज कांबळे यांच्या फिर्यादीवरून वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी नरेंद्र बागुले तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

SCROLL FOR NEXT