Bhusawal Crime Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal Crime : सख्ख्या भावानेच काढला भावाचा काटा, पैशासाठी नाते विसरला

Jalgaon News : वरणगाव आयुध निर्माणीच्या वसाहतीत क्वार्टर क्रमांक ४४ टाईप थ्रीमध्ये प्रदीप इंगळे वास्तव्यास होते. वरणगाव फॅक्टरीत सुपरवायझर होते.

Rajesh Sonwane

भुसावळ (जळगाव) : प्लॉट खरेदी विक्रीच्या कारणावरुन दोन्ही भावांमध्ये वाद सुरु होते. यावरून पुन्हा वाद उफाळून आल्याने मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या भावाच्या डोक्यात बॅटने जोरदार वार केला. यात लहान भावाचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना वरणगाव फॅक्टरी परिसरात घडली असून घटनेने खळबळ उडाली आहे. 

वरणगाव (Varangaon) ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सुपरवायझर प्रदीप जयसिंग इंगळे (वय ४८) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वरणगाव आयुध निर्माणीच्या वसाहतीत क्वार्टर क्रमांक ४४ टाईप थ्रीमध्ये प्रदीप इंगळे वास्तव्यास होते. वरणगाव फॅक्टरीत सुपरवायझर होते. दरम्यान ११ सप्टेंबरला ते दुपारी जेवणासाठी घरी आले होते. याच वेळी त्यांचा मोठा भाऊ सतीश इंगळे हा त्यांच्या घरी आला होता. (Crime News) दरम्यान प्लॉट विक्रीवरून दोघांमध्ये काल देखील वाद झाला. यात सतीशने प्रदीप यास मारहाण करण्यास सुरवात केली. यातच सतीशने प्रदीपच्या डोक्यात बॅटने वार केला. यामध्ये प्रदीपचं मृत्यू झाला. 

पोलिसांनी केली अटक 

दरम्यान घटना घडल्यानंतर सतीश हा प्रदीपच्या मृतदेहाजवळ बसून होता. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर भुसावळचे (Police) पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, वरणगावचे सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी, उपनिरीक्षक गांगुर्डे, उपनिरीक्षक सुशील सोनवणे, हवालदार संदीप बनसोडे, सुखराम सावकारे, होमगार्ड राम चौधरी, महेश चौधरी आदींनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सतीशला ताब्यात घेतले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT