Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News: पादचारीला ट्रॅक्‍टरची धडक; अंगावरून चाक गेल्‍याने मृत्‍यू

पादचारीला ट्रॅक्‍टरची धडक; अंगावरून चाक गेल्‍याने मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

वरणगाव (जळगाव) : तपत कठोरे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील राज्य मार्गाने पायी चालणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला भरधाव ट्रक्टरने चिरडल्याची घटना घडली. याबाबत मयताचा चुलत भावाच्या फिर्यादीवरून (Varangaon) वरणगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

वरणगाव पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपत कठोरा गावातील वरणगाव हतनूर राज्य मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ निंभोरा येथील २६ वर्षीय इकबाल शहा अब्दुल शहा फकिर हा पायी जात होता. या दरम्‍यान त्याला ट्रॅक्‍टरने (Accident News) चिरडले. चालक बाळकृष्ण गिरधर चौधरी याने रस्त्याच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने ट्रॅक्‍टर चालवत होता.

अंगावरून गेले ट्रॅक्‍टरचे चाक

ट्रॅक्‍टरची धडक बसल्‍यानंतर इकबाल खाली पडला; त्याच्या पोटावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. याचवेळी त्याचा चुलत भाऊ लतीफ शहा मुसा शाह फकीर तेथुन मोटारसायकलने जात असताना त्याने सदर घटना बघितली. यानंतर ट्रॅक्टर चालकाच्या मदतीने इकबाल यास गाडीमध्ये टाकून वरणगांव ग्रामीण रुग्णालयात नेले. येथील वैद्यकिय अधिकारींनी तपासणी करत मृत घोषीत केले. यानंतर मयत इकबालचा चुलत भाऊ लतीफ शहा याच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chole Bharture Recipe: स्ट्रीट स्टाईल चमचमीत छोले भटुरे बनवायचेत; फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप रेसिपी

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

Pune Crime: पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; कोरेगाव पार्क परिसरातील मध्यरात्रीच्या थराराने खळबळ

मोठी बातमी! राज्यमंत्र्याचे निधन, भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT