Temperature, Jalgaon Weather Updates in Marathi, Heat Wave News Updates Saam tv
महाराष्ट्र

आगामी पाच दिवस उष्णतेच्या लाट

आगामी पाच दिवस उष्णतेच्या लाट

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यात तापमानाने ४५ अंशाचा टप्पा ओलांडला आहे. उष्णतेची लाट जिल्ह्यात कायम आहे. यामुळे मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याअनुषंगाने पुढील पाच दिवस जिल्ह्याच्या तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे. आगामी पाच दिवस उष्णतेच्या लाटेची असण्याची शक्यता (Jalgaon News) असल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करावा, विशेषतः शेतात राबणारे कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांनी अधिक काळजी घ्यावी. (Jalgaon temperature news next five days heat wave)

प्रत्येक तालुक्‍यातील संबंधित यंत्रणा आरोग्य विभाग, महापालिका, सर्व ग्रामपंचायत कार्यालयांनी उष्माघाताने होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, दक्षता व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. विवाह, धार्मिक व सामाजिक मेळावे, शालेय व महाविद्यालय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, समारंभात आयोजक व प्रायोजकांनी उपस्थित सर्व नागरिकांचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आयोजनस्थळी सावलीसाठी ग्रीन शेड, मंडप, मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. (Railway) रेल्वे, बसस्थानक, बाजार परिसर, मंगल कार्यालयात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची पाणपोई, सावलीसाठी ग्रीन शेड तसेच आरोग्य विभागाद्वारे सुसज्ज उष्माघात कक्ष स्थापन करावेत. जेणेकरून उप्माघातांमुळे होणारी जीवितहानी टाळता येणे शक्‍य होईल. (Jalgaon Weather Updates in Marathi)

पारा ४५ अंशावर कायम

जळगाव जिल्‍ह्यातील तापमान मार्चच्‍या शेवटच्‍या आठवड्यापासूनच वाढले आहेत. पारा ४५ अंशाच्‍यावर कधीच पोहचला आहे. यात गेल्‍या आठवड्यापासून तापमानाचा पारा ४५ अंशावर स्‍थीर आहे. यामुळे उष्ण झळा अधिक जाणवत आहेत. यातच आगामी पाच दिवस उष्‍णतेची लाट सांगितली असून पारा ४६ अंशाच्‍या पार जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEED: मॅरेथॉनसाठी हायवेवर धावण्याची प्रॅक्टिस, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; शिक्षकांची अजब उत्तरं; VIDEO व्हायरल

Video : लोकसभेत गदारोळात मला मारहाण केली, जोरात ढकललं; महिला खासदाराचे केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप

LICची मोठी घोषणा! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरपर्यंत मिळणार विशेष सवलती

Online Gaming Regulation Bill: ऑनलाइन गेमिंगचा सरकारकडून 'गेम'; दोन्ही सभागृहात ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर

निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

SCROLL FOR NEXT