Raver Crime Saam tv
महाराष्ट्र

Raver Crime : खळबळजनक.. सावत्र बापाने केली चिमुकलीची हत्या; आईकडून पुरावा नष्ट करण्यासाठी मदत

Jalgaon News : भारत मसाणे याच्याशी २०१७ मध्ये झाला होता. पहिल्या पतीपासून माधुरीला मुलगा पीयूष (वय ५) व आकांक्षा (वय ३) आहे. मात्र, पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलांसह बेलसवाडी येथे राहत होती

Rajesh Sonwane

रावेर (जळगाव) : पहिल्या पतीसोबत पटत नसल्याने दुसरे लग्न केले. यामुळे दोन्ही मुलांना घेऊन दुसऱ्या पतीच्या घरी आली. मात्र सावत्र बापाने आईच्या संमतीने तीन वर्षीय चिमुकलीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना रावेरमध्ये घडली. मृत मुलीच्या सख्ख्या वडिलांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्याने आई व सावत्र बापाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील रहिवासी असलेली माधुरी हिचा विवाह वारोली (बऱ्हाणपूर- मध्य प्रदेश) येथील भारत मसाणे याच्याशी २०१७ मध्ये झाला होता. पहिल्या पतीपासून माधुरीला मुलगा पीयूष (वय ५) व आकांक्षा (वय ३) आहे. मात्र, पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलांसह बेलसवाडी येथे राहत होती. त्यानंतर तिने रावेर (Raver) येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसांपूर्वी लग्न केले. तेव्हापासून दोन्ही मुले रावेर येथे अजयकडे राहत होती. 

दरम्यान ३१ मे रोजी अजयने सकाळी नऊच्या सुमारास सावत्र मुलगी आकांक्षाला लाकडी दांड्याने मारले, तसेच गळा दाबून जीवे मारले. हा (Crime News) प्रकार माधुरीस माहीत असताना तिने पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीला बेलसवाडी येथे नेले. मात्र, माधुरीचा पहिला पती व मुलीचे सख्खे वडील भारत मसाणे याला हे समजल्यावर त्यांनी बेलसवाडी गाठले. मुलाला याबाबत विचारणा केल्यावर दुसऱ्या पप्पाने मारल्याचे मुलाने सांगितले. तसेच मुलीच्या गळ्याजवळ खुणा दिसून आल्याने त्यांनी अंतुर्ली पोलिस चौकीत जात तक्रार दिली. शवविच्छेदनाअंती मुलीचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने मुलीची सख्खी आई व सावत्र बाप या दोघांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप सोडताच बड्या नेत्यानं मागितला थेट पंतप्रधान मोदींचा राजीनामा; काय आहे प्रकरण?

Maharashtra News Live: पारोळा तालुक्यात अतिवृष्टीचा कहर; शेतजमीन खरडली, पिकांसह ठिबक आणि अवजारे वाहून गेली

Veen Doghantali hi Tutena: समर-स्वानंदी गेले नाटक पाहायला; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये स्वप्नील जोशीची एन्ट्री

Commonwealth Games 2026: 36 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! भारतीय ज्युडोपटूंचा इतिहास; अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांची सुवर्णपदकाची कमाई

गुलाबी अदा! प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नजर हटत नाही

SCROLL FOR NEXT