Jalgaon News Varangaon Factory Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: वरणगाव फॅक्टरीत पावडरचा स्‍फोट; दोन कर्मचारी जखमी

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : वरणगांव फॅक्टरीमध्ये रविवार रात्री साडेआठ वाजेच्‍या सुमारास प्राईमिंग विभागात स्फोटक पावडरचा स्फोट झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची कारणे (Varangaon) शोधण्यासाठी चौकशी मंडळांची स्थापना केली आहे. (Maharashtra News)

सध्या सरकारकडून वरणगांव फॅक्टरी खाजगीकरणाचा प्रयत्नात काम वाढविण्याचे सत्र सुरु आहे. याच कारणामुळे अपघात झाल्याचे समजते. फॅक्टरीमध्ये काम वाढीसाठी कामगारांना प्रेशर दिले जात आहे. सवलती बंद होत आहेत. कोणताही ट्रेडमनचा कुठेही वापर होत आहे. धोक्याच्या विभागामध्ये संबंधित ट्रेडमन काम न करता सर्व (Jalgaon News) प्रकारचे कामगारांकडून काम केले जात आहे. वरीष्ठस्तरावर याबाबत दखल घेण्याची गरज आहे असे कामगारांची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

वरणगांव फॅक्टरीमध्ये झालेल्‍या स्‍फोटात प्रशांत पाटील (तळवेल) यांच्या डाव्या हाताची मनगट भाजले गेल्याने कायमचे निकामी झाले आहे. त्‍यांना उपचारासाठी बऱ्हाणपूर येथे खासगी दवाखान्यात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. तर चेतन पाटील यांचा भुसावळमध्ये उपचार सुरू आहे. दोघांची प्रकृती सामान्य आहे.

वरणगांव आयुध निर्माणीचे (Bhusawal) सुरक्षा अधिकारी एस. आर. पाटील यांनी रिदम हॉस्पिटलला भेट दिली. तर वरणगांव आयुध निर्माणीचे (जी.एम) ए. के. सिंग यांनी बऱ्हाणपूर येथील ऑल इज वेल हॉस्पिटलला भेट दिली. त्या दरम्यान यांनी कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम उपचार देण्याचे आश्वासन दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT