महाराष्ट्र

पक्षाच्‍याच पालकमंत्रीवर आरोप करणे आमदाराचा बालिशपणा; माजी आमदार पाटील

पक्षाच्‍याच पालकमंत्रीवर आरोप करणे आमदाराचा बालिशपणा; माजी आमदार पाटील

संजय महाजन

संजय महाजन

जळगाव : आमदार चिमणराव पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर त्रास देत असल्याचा आरोप केला. आमदाराने अशा प्रकारचा आरोप करणे म्हणजे बालिशपणा आहे. त्यास काही तथ्य नाही; अशी प्रतिक्रिया राष्‍ट्रवादीचे माजी आमदार डॉ. सतिश पाटील यांनी दिली. (jalgaon-political-news-mla-chimanrao-patil-shiv-sena-and-Former-MLA-Satish-Patil)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना माजी आमदार डॉ. सतिश पाटील यांनी संवाद साधला. यात त्‍यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या भूमीकेवर टिका करीत राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे; माझा पक्षही या आघाडीत आहे. पालकमंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा चिमणराव पाटील यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे बाजू मांडायला हवी होती. असे जाहीरपणे काही बोलण्यात अर्थ नसतो.

मुलाला पद न दिल्‍याने आगपाखड

आमदार चिमणराव पाटील यांना त्यांच्या मुलाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख करायचे होते. याकरीता ते मुंबईत ठाण मांडून होते. मात्र शिवसेना नेतृत्वाने हे पद डॉ. हर्षल माने यांना दिले. या शल्यातूनच आमदार चिमणराव पाटील यांनी अशी आगपाखड केली असावी. यातून एकच दिसते की, ते नेहमी चुकीच्या पध्दतीने राजकारण करतात आणि चुकीच्या पध्दतीने राजकारण हेच त्यांचे आत्तापर्यंत धर्म आणि कर्म राहिले आहे.

गुलाबराव पाटील ज्‍येष्‍ठच आहेत

चिमणराव पाटील शिवसेनेत कधी आले हे सगळ्यांना माहित आहे. चिमणराव पाटील यांच्यापेक्षा गुलाबराव पाटील सगळ्याच बाबतीत ज्येष्ठ आहेत. गुलाबराव पाटील चौथ्यांदा निवडून आले आहे. शिवसेना पक्ष संघटनेसाठी त्यांचे काम मोठे आहे. डॉ. हर्षल माने गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेसाठी सक्रिय आहेत. मतदार संघात जे सध्या सुरू आहे. ते चुकीचे आहे. काहीतरी आरोप करून शिवसेनेतून बाहेर पडायचे. बाहेर पडण्यासाठी काहीतरी कारण शोधायचे, म्हणून तर चिमणराव पाटलांचा हा खटाटोप नाही ना? असा प्रश्‍न माजी आमदार पाटील यांनी उपस्‍थीत केला. चिमणराव पाटील शिवसेनेतून बाहेर पडले तरी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महत्व देणार नाही. शेवटी त्यांच्यापुढे भाजप हाच पर्याय त्यांना दिसत असावा. आपली हुकूमशाही चालावी हीच आमदार चिमणराव पाटलांची वृत्ती असल्याचा आरोपही माजी आमदार डॉ. सतिश पाटील यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT