Satish Patil Saam tv
महाराष्ट्र

Bajar Samiti Election: पारोळा बाजार समितीत माजी आमदारांचे दोन्‍ही नामांकन अवैध

पारोळा बाजार समितीत माजी आमदारांचे दोन्‍ही नामांकन अवैध

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : बाजार समितीच्या आलेल्या अर्जांच्‍या छाननीत काही अर्जांवर हरकती आल्या होत्या. त्यावर (Jalgaon News) चर्चा होऊन आज सुनावणी झाली. यात माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचे सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय या दोन्ही मतदारसंघातील अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. (Tajya Batmya)

जळगाव जिल्हा परिषद माजी सभापती डॉ. दिनकर चुडामण पाटील यांनी डॉ. सतीश पाटील यांच्या अर्जांवर हरकती घेतल्या होत्या. त्यावर दोन्‍ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. त्यानुसार निवडणूक अधिकारी कासार यांनी ही दोघ नामांकन अवैध ठरविले. तसेच अमोल चिमणराव पाटील (Bajar Samiti Election) यांच्या नामांकनावर घेतलेल्या हरकतीस फेटाळून लावून त्यांचे नामांकन वैध ठरविण्यात आले. तसेच रेखा सतीश पाटील यांचाही उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला आहे.

१५५ उमेदवार रिंगणात

एकूण १६० नामांकनापैकी पाच नामांकन अवैध ठरविण्यात आले असून १५५ नामांकन रिंगणात आहेत. सेवा सहकारी गटातून सर्वसाधारण एक इतर मागासवर्गीय एक ग्रामपंचायत सर्वसाधारण दोन तर आर्थिक दुर्बल एक अशी एकूण पाच नामांकन अवैध करण्यात आले आहे. तीन उमेदवारांनी आपले सातबारा व शेतकरी असल्याचा दाखला दिला नसल्याने त्यांची नामांकने रद्द ठरविण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Air Filter: बाईकचा एअर फिल्टर किती किलोमीटर्सनंतर बदलावा?

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT