Jalgaon Pachora News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: चार बहिणींचा एकुलता एक भाऊ..दोन दिवस मावशीकडे आला अन्‌ जीव गमावला

चार बहिणींचा एकुलता एक भाऊ..दोन दिवस मावशीकडे आला अन्‌ जीव गमावला

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथे मावशीकडे आलेल्या गोविंद समाधान मोरे (वय २३) या युवकाचा धरणाच्या (Jalgaon News) पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १ एप्रीलला घडली. त्यामुळे वाडे गुढे व खडकदेवळा येथे शोककळा पसरली. (Tajya Batmya)

वाडे गुढे (ता. भडगाव) येथील रहिवासी असलेला गोविंद मोरे हा २७ एप्रिलला खडकदेवळा (ता. पाचोरा) येथे आपल्या मावशीकडे आला होता. तो रविवारी (ता. ३०) खडकदेवळा (Pachora) येथील हिवरा धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. तो बुडाल्याची घटना गावात कळताच पट्टीच्या पोहणाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली व त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह

दरम्यान, १ मेस दुपारी गोविंदचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगताना दिसून आला. रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला व शवविच्छेदन करून तो नातलगांच्या ताब्यात दिला. मृत गोविंद मोरे हा चार बहिणींचा एकुलता भाऊ होता. त्याच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी असा परिवार आहे. त्याच्या मृत्युमुळे वाडे गुढे व खडकदेवळा या दोन्ही गावात शोकळा पसरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT