Pachora News Saam tv
महाराष्ट्र

Pachora News : अग्नावती नदीला पूर; बाजारातील साहित्य जमा करताना दोघे गेले वाहून

Jalgaon News : रविवारी रात्रीसुध्दा पाचोरा आणि भडगाव तालुक्याला पुन्हा एकदा झोडपून काढले. त्यामुळे नगरदेवळा परिसरातील तितूर, अग्नावती, गडद, अरुणावती या नद्यांना पूर

Rajesh Sonwane

पाचोरा (जळगाव) : जोरदार येणाऱ्या परतीच्या पावसाने नदी, नाल्यांना पूर आला आहे. यात पाचोरा तालुक्यातील अग्नवती नदीला देखील मोठा पूर आल्याने पुराचे पाणी बाजारपेठेत शिरले होते. यामुळे बाजारपेठेतील साहित्य गोळा करत असताना पाण्याचा अचानक लोंढा आल्याने यात दोन जण वाहून गेल्याची घटना नगरदेवळा येथे घडली. 

पाचोरा (Pachora News) तालुक्यातील नगरदेवळा येथील सीमा सुरक्षा दलातील निवृत्त जवान रवींद्र प्रभाकर पाटील (वय ४०) आणि राजेंद्र गोरख पाटील (वय ३८) अशी मृतांची नावे आहेत. जळगाव जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार (Heavy Rain) होत आहे. यात रविवारी रात्रीसुध्दा पाचोरा आणि भडगाव तालुक्याला पुन्हा एकदा झोडपून काढले. त्यामुळे नगरदेवळा परिसरातील तितूर, अग्नावती, गडद, अरुणावती या नद्यांना पूर आला. यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. 

दरम्यान अग्नावती नदीला आलेल्या पुराचे पाणी सोमवारी पहाटे नगरदेवळा येथील बाजारपेठेत शिरले. अग्नावती नदीला पूर आला असताना बाजारातील साहित्य आवरताना पुराचा लोंढा आल्याने रवींद्र पाटील व राजेंद्र पाटील हे दोघे वाहून गेले. दुपारी बाजारपेठेतील दुकानदार आपल्या दुकानाकडे आले असता, त्यांना नदीकाठावरील झुडूपांमध्ये या दोन जणांचे मृतदेह आढळून आले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दोघांचे मृतदेह देण्यात आले यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT