Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: दोन दिवसांपूर्वी झाला विवाह; माहेरी आल्‍यावर प्रियकरासोबत गेली अन्‌..पहाटे समोर आला धक्‍कादायक प्रकार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमीयुगुलाने एकाच दोरीने गळफास लावुन (Jalgaon News) आत्महत्या केल्याची घटना आज (२६ जून) पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने जिल्हयाच मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी (Pachora) पाचोरा पोलीस स्टेशनला सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)

पाचोरा तालुक्‍यातील वरखेडी नाका परिसरातील जितेंद्र राजु राठोड (वय १९) व साक्षी सोमनाथ भोई (वय १८) असे मयत प्रेमी युगलाचे नाव आहे. पाचोरा शहरातील वरखेडी नाका परिसरात जितेंद्र राठोड हा त्याच्या कुटुंबासह वास्तव्यास होता. तर जितेंद्रच्या घरापासून दोन घरे सोडून साक्षी भोई ही कुटुंबासह (Marriage) वास्तव्यास होती. दरम्‍यान रविवारी रात्री जितेंद्र व साक्षी या दोघांनी एकमेकांना फोनवरुन संपर्क केला. त्यानंतर रात्रीच घराच्या मागे असलेल्या मोंढाळा रोडवरील पडक्या अंगणवाडी शाळेच्या ठिकाणी भेटायचे ठरवले. या ठिकाणी जितेंद्र व साक्षी या दोघांनी एकाच दोरीने गळफास लावून जीवन संपवले.

दोन दिवसांपुर्वीच साक्षीचा विवाह

दरम्यान पहाटे तीन वाजेच्या सुमारास साक्षी हिच्या भावाला जाग आली. तेव्हा त्याने बहिण साक्षी हिला शोधले असता ती मिळून आली नाही. घराच्या मागील बाजूस अंगणवाडीच्या ठिकाणी काहीतरी असावे; म्हणून त्या ठिकाणी पाहण्यास गेले. तर तेथे साक्षी व जितेंद्र हे दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. कुटुंबियांकडून दोघांच्या लग्नाला विरोध होता. यात साक्षी भोई हिचा दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २३ जून रोजी विवाह झाला आहे. विवाह नंतर ती रविवारी माहेरी आली होती. यानंतर जितेंद्र व साक्षी या दोघांनी टोकांचे पाऊल उचलल्याचे (Police) सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी जात माहिती जाणून घेतली. पोलिस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे यांनी रुग्णवाहिका चालक अमोल पाटील याला सोबत घेत घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. तसेच रुग्णवाहिकेतून मदतीने दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मयत साक्षी भोई हिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पती असा परिवार आहे तर मयत जितेंद्र राठोड यांच्या पश्चात आई-वडील व तीन बहिणी असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल खताळ व त्यांचे सहकारी प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT