Jalgaon ZP Saam tv
महाराष्ट्र

जि. प. गटाचे सीमांकन बदलप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका

जि. प. गटाचे सीमांकन बदलप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव तालुक्‍यातील नव्‍याने तयार केलेल्‍या भादली बु.- कुसुंबा खु या जिल्हा परिषद गटाचे भौगोलिक सीमांकन बदलल्याप्रकरणी जिल्‍हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. (jalgaon zilha parishad Petition to Aurangabad Bench for change of demarcation of the group)

जळगाव (Jalgaon) जिल्‍हा परिषदेत (Jalgaon ZP) दहा गट वाढल्‍याने अनेक गटांमध्‍ये बदल झाला आहे. यानुसार भादली बु- कुसूंबा खु. या नव्‍याने रचना झालेल्‍या गटाचे भौगोलिक सीमांकन चुकीचे असल्‍याची हरकत लालचंद पाटील यांनी घेतली होती. याबाबत नाशिक (Nashik) विभागीय आयुक्तांकडे हरकत घेतली होती. मात्र, राजकीय दबावामुळे नाशिक विभागीय आयुक्तांनी सदरची हरकत फेटाळली. नवीन रचनेत जळगावची हद्द सोडून मोहाडी, सावखेडा गावांचे भौगोलिक सीमांकन करून चुकीचे गाव जोडली आहेत.

११ जुलैला सुनावणी

भादली बुद्रुक व कुसुंबा खुर्द जिल्हा परिषद गटाचे भौगोलिक सीमांकन राजकीय दबावापोटी चुकीचे केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी, नाशिक विभागीय आयुक्त, ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य व निवडणूक आयुक्त यांच्या निर्णयाविरोधात माजी जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात खंडपीठात रिटपीटिशन याचिका दाखल केली आहे. त्यासंदर्भात ११ जुलैला सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT