Jalgaon Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: राज्यपाल कोश्‍यारींच्‍या विरोधात युवासेनेची स्वाक्षरी मोहीम; वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी

राज्यपाल कोश्‍यारींच्‍या विरोधात युवासेनेची स्वाक्षरी मोहीम; वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतून राजस्थानी व गुजराती लोक जर बाहेर गेले; तर मुंबई (Mumbai) ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य केले. या वक्तव्याच्या विरोधात महाराष्‍ट्रभर निषेध केला जात आहे. त्‍यानसार जळगावात (Jalgaon) देखील राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात युवासेना महानगरतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. (Jalgaon News Yuva Sena)

युवासेनेकडून राज्यपालांच्या विरोधात जळगाव शहरातील काव्यरत्नवली चौक व नेहरू चौक येथे स्‍वाक्षरी मोहिम राबविली. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा धिक्कार असो.., या राज्यपालाचं करायचा काय? खालती डोकं वरती पाय...अशी घोषणाबाजी युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून राज्यपाल भगतसिंग जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना (Shiv Sena) सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT