Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : गावाकडे परतताना एकुलत्या एक मुलाला हिरावले; रेल्वेतून पडून मुलाचा मृत्यू, आईचा आक्रोश

Jalgaon News : आई सखुबाई नाशिक येथे उदरनिर्वाहासाठी गेल्या होत्या. मात्र, नाशिकला नको, आपल्या गावाकडेच काम करू, असे म्हणून आनंदने आईला घरी आणण्याचा निर्णय घेत एक्स्प्रेसने नाशिकहून निघाले

Rajesh Sonwane

जळगाव : कामानिमित्त नाशिकला असलेल्या आईला घेऊन मुलगा गावाकडे निघाला होता. मात्र गावी येण्यापूर्वीच आईच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जळगाव ते भुसावळ दरम्यान रेल्वेतून पडल्याने घरातील कमावत्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने आई आणि दोन बहिणींचा आधार गेला आहे. सदर घटना ६ जूनला जळगाव तालुक्यातील तरसोदजवळच्या रेल्वेरूळाजवळ घडली.

रावेर तालुक्यातील निंभोरा येथील आनंद अशोक रजाने (वय ३३) असे मृत तरुणाचे नाव आहे. आई व दोन बहिणीसह तो वास्तव्यास होता. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. आनंदची आई सखुबाई नाशिक येथे उदरनिर्वाहासाठी गेल्या होत्या. मात्र, नाशिकला नको, आपल्या गावाकडेच काम करू, असे म्हणून आनंद याने आईला घरी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ६ जूनला दुपारी गीतांजली एक्स्प्रेसने दोघेजण नाशिकहून भुसावळ जाण्यासाठी निघाले.

बाथरूमला गेला अन दरवाजातून कोसळला 

दरम्यान जळगाव स्थानक सोडल्यानंतर आनंद बाथरूमला गेला. याचवेळी अचानक कोणीतरी गाडीतून पडला, म्हणून लोकांनी आवाज दिला. हे ऐकून आई सखुबाई या दरवाजाकडे आल्या असताना त्यांना मुलगा आनंद रेल्वेतून पडल्याचे समजले. यावेळी सखुबाई यांनी एकच आक्रोश केला. रेल्वेतील प्रवाशांनी त्यांना धीर देऊन भुसावळ स्थानकावरून जळगाव येथे जाण्यासाठी सांगितले. सखुबाई जळगावला पोहोचल्या व त्यांनी मुलगा आनंद असल्याची माहिती पोलिसांना दिली. 

घराचा आधार गेला 

मुलगा मृत झाल्याची माहिती मिळताच आईने एकच आक्रोश केला. तर घरी भाऊ आणि आईची वाट पाहणाऱ्या बहिणींना देखील मोठा धक्का बसला आहे. आनंदच्या मृत्यूने घरातील एकुलता एक मुलगा आणि कमावता एकट्या पुरुषाच्या मृत्यूने घराचा आधारच गेला आहे. या घटनेमुळे पोलिसही स्तब्ध झाले होते. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत डेडलाइन वाढली; आजच करा हे काम

Stylish Blouse Designs : साडी, लेहेंगा अन् स्कर्ट; एकाच ब्लाउजचे अनेक लूक्स, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला

Nashik TCS Case : लैंगिक शोषण अन् अश्लील टोमणे...; नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणात २० तरुणींनी सांगितली आपबीती

Chanakya Niti Tips: 'या' 4 ठिकाणी दान केल्यास व्हाल मालामाल, चाणक्यांनी सांगितले झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग

SCROLL FOR NEXT