Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: काही दिवसांवर लग्‍न असताना तरूणीची आत्‍महत्‍या

काही दिवसांवर लग्‍न असताना तरूणीची आत्‍महत्‍या

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : यावल तालुक्यातील अंजाळे येथील लग्न घटीका जवळ आलेल्या तरूणीने आपल्या घरात (Jalgaon) गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. सदर तरूणीने अशा प्रसंगी आत्महत्या केल्याने कुटुंबावर शोककळा पसरली. पोलीस (Police) ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Live Marathi News)

पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्‍या माहितीनुसार मिनल निवृत्ती भागवत (वय २३) या तरुणीने शनिवार (१५ ऑक्‍टोंबर) सकाळी दहा वाजेपुर्वी राहत्या घरातील छ्ताच्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केली. याबाबत मयत तरूणीचे वडील निवृत्ती किसन भागवत यांनी खबर दिल्याने यावल (Yawal) पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी हे करीत आहे.

विवाहापुर्वी आत्‍महत्‍येचे रहस्‍य

आत्महत्या केलेल्या तरुणीचे लग्न जुळले असून तिचा साखरपुडा झाला होता. दिवाळीनंतर विवाह नियोजित होता अशी माहीती मिळत आहे. त्यामुळे विवाहाची वेळ जवळ आली असताना तरुणीने आत्मह्त्वा का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

SCROLL FOR NEXT