जळगाव : घरात असताना सुसाईड नोट लिहून कर्जबाजारीला कंटाळल्याचे कारण दाखवत तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news young man took the gallows after writing a suicide note)
जळगाव (Jalgaon) शहरातील आहुजानगर परिसरालगत असलेल्या सुकृती अपार्टमेंटमधील अविनाश उर्फ बाळू अरुण बोरसे (वय ३९) असे मयत तरुणाचे नाव आहे. अविनाश बोरसे हा पत्नी व मुलांसह वास्तव्याला होता. काही दिवसांपासून अविनाश बोरसे यांची पत्नी बाहेरगावी गेल्या होत्या. त्यामुळे (Suicide) अविनाश घरी एकटाच होता. शनिवारी (१२ मार्च) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अविनाशची आई सुनंदाबाई यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु फोन लागत नाही. यामुळे त्यांनी जवळ राहत असलेला भाचा प्रशांत पाटील यांना फोन करून अविनाशबाबत चौकशी करण्यास सांगत कळविण्यास सांगितले.
बाल्कनीतून पाहिले तर..
प्रशांत पाटील हा घरी गेला असता अविनाशचा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने बाल्कनीमधून डोकावून पाहिले असता अविनाशने गळफास घेवून आत्महत्याचे केल्याचे दिसून आले. अविनाशने आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट (Suicide Note) लिहून ठेवली होती. त्यात ‘मी कर्जबाजारी झालेला असल्याने स्वत:च्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहे.’ असे नमूद केल्याचे आढळून आले. याबाबत तालुका पोलीसांना कळविण्यात आले. पोलीस येवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) दाखल करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.