Death Saam tv
महाराष्ट्र

फोटोशुटच्या नादात तरुणाने गमावले प्राण

फोटोशुटच्या नादात तरुणाने गमावले प्राण

साम टिव्ही ब्युरो

जळगाव ः मित्रांसोबत फोटोशूट करतांना शुभम कांतीलाल चव्हाण (वय-१८, रा. वानखेडे सोसायटी) या तरुणाचा कांताई बंधार्‍यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. (Jalgaon news young man lost his life in the noise of the photoshoot)

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील वानखेडे सोसायटीतील रहिवाशी शुभम कांतीलाल चव्हाण हा तरुण मित्रांसोबत फोटो शुटसाठी कांताई बंधारा परिसरात गेला होता. मित्रांची मस्करी चालू असताना त्यापैकी २ जण पाय घसरून पाण्यात बुडाले होते. यापैकी एकाला या मित्रांनी वाचवले. मात्र शुभमचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तालूका पोलिसांनी पट्टीच्या पोहणार्यांना घेत घटनास्थळ गाठले. मात्र, चार तास उलटूनही सायंकाळी साडेसहा वाजेनंतर शुभमच्या मृतदेह सापडून आला. मृतदेह बघताच त्याचे मित्र आणि कुटूंबीयांनी एकच आक्रोश केला. शुभम चव्हाणच्या वडिलांचे न्यू बी. जे. मार्केटमध्ये चव्हाण इलेक्ट्रिकल्स नावाचे दुकान आहे. त्याच्या पश्चात २ बहिणी, आई-वडील आणि आजोबा असा परिवार आहे .

एकुलत्या मुलाचा मृत्यु

कांताई बांधाऱ्यात बऱ्यापैकी पाणीसाठा असून जैवविवधतेसह परीसर बहरला आहे. परिणामी सुटीच्या दिवशी पिकनिक स्पॉट म्हणुन येथे गर्दी उसळते. शुभम चव्हाण व त्याच्या मित्रांनी रविवारी फोटोशुट साठी कांताईबंधारा गाठला.मित्रांसोबत मजा-मस्करीत पाय घसरुनतो डोहात बुडाल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसवणार? नाचक्की टाळण्यासाठी ट्रम्प यांचा निर्णय, VIDEO

पेट्रोलचे दर 500 रुपयांवर जाणार? युद्धामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळणार?

SCROLL FOR NEXT