Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : तरुणाने पुलावरून उडी घेत संपवले जीवन

Jalgaon News : तरुणाने पुलावरून उडी घेत संपवले जीवन

Rajesh Sonwane

जळगाव : यावल तालुक्यातील बामणोद येथील एका तरुणाने तापी नदीच्या (Tapi River) पुलावरून उडी मारत (Jalgaon) आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु नदीत उडी मारल्यानंतर तो जखमी झाला. यानंतर त्याला दवाखान्यात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

इंदिरानगर बामणोद (ता. यावल) येथील देवेंद्र पंकज पाटील (वय १९) असे तरुणाचे नाव आहे. देवेंद्र याने ३ सप्टेंबरला रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तापी नदीच्या पुलावरून उडी घेतल्यानंतर तो गंभीर जखमी झाला. देवेंद्रला उडी मारतांना काहींनी पहिले होते. यामुळे त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात घेवुन जात असतांना उपचारापुर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

या संदर्भात भाऊ भूषण पाटील यांनी फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली. देवेंद्रच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अजून समोर आलेले नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गोकुळ तायडे करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT