Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : आई– वडीलांशी गप्‍पा मारून वरच्‍या खोलीत गेला; कुटूंब गेले असता फोडला हंबरडा

आई– वडीलांशी गप्‍पा मारून वरच्‍या खोलीत गेला; कुटूंब गेले असता फोडला हंबरडा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : नशिराबाद (ता. जळगाव) येथील २० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. (Jalgaon) धीरज प्रभाकर कोष्टी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बीएससीच्या वर्गात शिक्षण घेत होता. (Latest Marathi News)

धीरज कोष्टी हा शनिवारी (ता. ८) सायंकाळी आई– वडिलांसोबत खालच्या खोलीत गप्पा मारल्या. काही वेळाने तो दुसऱ्या मजल्यावर गेला व दोरीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही धीरज खाली का येत नाही. हे पाहण्यासाठी धीरजचे कुटुंब वरील मजल्यावर गेले असता, धीरज गळफास घेतलेल्या (Jalgaon Medical Collage) दिसून आल्यावर आईवडिलांनी हंबरडा फोडला.

शेजारील ग्रामस्थांनी धाव घेऊन धीरजला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्यास मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. धीरजच्या पश्चात आई कांताबाई, वडील प्रभाकर कोष्टी, तीन बहिणी असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंढेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT