Suicide Saam tv
महाराष्ट्र

आजारपणाला कंटाळून तरूणाची आत्‍महत्‍या

आजारपणाला कंटाळून तरूणाची आत्‍महत्‍या

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सतत आजारी असल्‍याने या आजारपणाला कंटाळून शहरातील तरूणाने झाडाला रूमालाने बांधून आत्महत्या केली. ही घटना आज समोर आली असून तालुका पोलीस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news Young man commits suicide by getting sick)

जळगाव (Jalgaon) शहरातील खोटेनगर परिसरात विलास महाजन हा राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो आजारी देखील होता. या आजारपणाला कंटाळून विलासने राहत असलेल्‍या ठिकाणावरील झाडाला रुमालाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवीली. ही घटना परिसरातील रिक्षा स्टॉपवरील रिक्षाचालकांच्या लक्षात आली.

पोलिसांकडून पंचनामा

याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना दिल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वासुदेव सोनवणे, सतिष हाळनोर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह खाली उतरविला. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT