महाराष्ट्र

धक्कादायक..बेपत्ता दोन्ही मुलांचे आढळले मृतदेह; आई- वडिलांचा आक्रोश

धक्कादायक..बेपत्ता दोन्ही मुलांचे आढळले मृतदेह; आई- वडिलांचा आक्रोश

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : चुंचाळे (ता.यावल) येथील दोन भावंडे कालपासून बेपत्ता होते. गुरूवारी दुपारी दोन्ही भावंडांचा त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (jalgaon-news-yawal-chunchale-village-two-child-missing-but-next-day-deathbody-in-well)

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील गायरान परिसरात रवींद्र मधुकर सावळे (वय ३५) आणि उज्ज्वला सावळे हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना रितेश (वय 4) आणि हितेश (वय 3) ही मुले आहेत. बुधवारी आई- वडिलांसोबत दोन्ही मुले स्वत:च्या चुंचाळे शिवारातील शेतात गेली होती. सावळे दाम्पत्य शेतात काम करत असतांना ही दोन्ही मुले खेळत असल्याने कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. यात दोन्ही मुले बेपत्ता झाले होते.

शोधूनही सापडली नाही

चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीम आदींसह पंचक्रोशीत त्यांचा शोध घेण्यात आला. परंतू ते कुठेही आढळून आले नाही. याबाबत यावल पोलीसात रात्री उशीरा बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

विहिरीत तरंगतांना आढळले मृतदेह

दरम्यान गुरूवारी (२८ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याच शेतातील विहिरीत दोघांचा मृतदेह तरंगतांना आढळून आल्याचे खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी विहिरीजवळ प्रचंड आक्रोश केला होता. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोउनि जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ आदींनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी शेतातील विहिरीजवळ चिंचोली गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी जमली होती.

काकाला घेतले ताब्यात

दरम्यान मयत झालेल्या बालकांचा चुलत काका हा मनोरूग्ण असल्याने त्यानेच विहिरीत मुलांना फेकल्याचा अंदाज आहे. त्यामुळे चुलत काकाला चौकशीसाठी यावल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT