Gold Price Today Saam tv
महाराष्ट्र

Gold Price Today: आठवडाभरात सोने हजार रुपयांनी घसरले; ऐन लग्नसराईत खरेदीची मोठी संधी

आठवडाभरात सोने हजार रुपयांनी घसरले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सुवर्ण बाजारात नेहमीच चढउतार पहावयास मिळतो. मागील दीड महिन्‍यात सोने व चांदीच्‍या (Gold And Silver) दरात सातत्‍याने वाढ होत असल्‍याचे पहावयास मिळाले. मात्र मागील आठवडाभरात सोने व चांदीच्‍या दरात घसरण (Gold Price Today) झाली आहे. यामुळे खरेदीदारांना मोठी संधी निर्माण झाली आहे. (Maharashtra News)

जळगावात दागिन्यांची खरेदी करण्यासाठी गुजरात, मध्‍यप्रदेशसह अन्‍य राज्यांमधून ग्राहक येतात. लग्‍नसराईमुळे जानेवारी ते मे दरम्‍यान सराफ बाजारातील उलाढाल अधिक असते. लग्नासाठी सर्वसामान्य ग्राहक सोन्याच्या दागिन्यांची खरेदी ही किमान एक महिनाभर अगोदर करतात. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात फारशा लग्नतिथी नाहीत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्‍यात काही अपेक्षित अशी उलाढाल यंदा झालेली पहावयास मिळालेली नाही.

सोने– चांदीच्‍या दरात घसरण

दरम्यान, सोन्याचे भाव आठवडाभरापूर्वी अर्थात १९ फेब्रुवारीला ५७ हजार २०० रुपये प्रतितोळा (१० ग्रॅम) होते. मात्र हेच भाव २६ फेब्रुवारीला ५६ हजार ५०० रुपयांवर आले. तर चांदीचे दर आठवडाभरापूर्वी ६६ हजार ५०० रुपये किलो होते. हे दर ६५ हजार ६०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिरूर बसस्थानकातून दुचाकी लंपास; सीसीटीव्हीत कैद प्रकार, चोरट्यांना कायद्याचा धाक नाही?

Peddi movie: 'राम चरण तिच्याकडे वासनेच्या नजरेने...'; जान्हवी कपूरचा 'ग्लॅमरस शो-पीस' म्हणून वापर, चाहते इतके का संतापले?

Political News: मुंख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, कॅबिनेट मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Pune : पुण्यातील भयंकर घटना! सिलिंडर बदलताना अचानक ब्लास्ट, एकाचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?

Shivrajyabhishek 2026: राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर जाताय? मुंबई-पुण्याहून कसे पोहोचाल, किती येईल खर्च? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT