Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : पत्नी माहेरी जाताच तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : कैलास हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पत्नी, आई, एक मुलगी व दोन मुलांसह तो सुप्रिम कॉलनीत वास्तव्यास होता.

Rajesh Sonwane

जळगाव : पत्नी मुलांसह माहेरी तर आई गुजरात येथे गेली असताना एका तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. सदरची घटना जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत उघडकीला आली आहे. 

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील कैलास इंदल राठोड (वय ३४) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कैलास हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पत्नी, आई, एक मुलगी व दोन मुलांसह तो सुप्रिम कॉलनीत वास्तव्यास होता. दरम्यान घरी एकटेच असताना रविवारी सकाळी कैलास यांनी राहत्या घरात गळफास घेतला. दरवाजा अर्धा उघडा असल्याने शेजारच्यांना ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

पत्नी- आईचा आक्रोश 

शेजाऱ्यांनी कैलास यांच्या काकांच्या घरी जाऊन सांगितल्यावर तत्काळ त्यांनी धाव घेत शेजारच्यांच्या मदतीने खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती माहेरी गेलेल्या पत्नीला कळविताच त्या जळगावी आल्या. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: क्रॉक्रोच पार्टी विरोधात झेन नेक्स्ट तरुण उतरणार रस्त्यावर

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

Acidity : सकाळचा चहा विसरा! दिवसाची सुरुवात करा 'या' पेयाने, ॲसिडिटी-जळजळ झटक्यात होईल गायब

SCROLL FOR NEXT