महाराष्ट्र

रिमझिम पावसाने भिंत कोसळली; चार वर्षीय चिमुकल्‍याचा मृत्‍यू

रिमझिम पावसाने भिंत कोसळली; चार वर्षीय चिमुकल्‍याचा मृत्‍यू

Rajesh Sonwane

यावल (जळगाव) : मालोद (ता.यावल) येथील ईमाम दगडु तडवी यांच्या घराची मातीची भिंत कोसळली. यात घरात खेळत असलेल्‍या आबीद तडवी (वय ४) हा दबला गेला. गावातील नागरीकांनी कोसळलेल्या भिंतीच्या ढीगाऱ्यातून चिमुकल्‍याला बाहेर काढले मात्र त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला होता. (jalgaon-news-wall-collapsed-in-the-pouring-rain-Four-year-old-child-dies)

जळगाव जिल्‍ह्यातील अनेक भागात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. आदिवासी परिसर असलेल्‍या मालोद या गावात सकाळी दुर्घटना घडली. मातीचे घर असल्‍याने पावसाचे पाण्याने भिंत ओली होवून पाणी त्‍यात मुरले होते. यामुळे कोणाला काही समजण्याच्‍या आधीच अचानक भिंत कोसळली.

निष्‍पाप चिमुकल्‍याचा जीव गेला

बाहेर पाऊस सुरू असल्‍याने चिमुकला आबीद घरातच खेळत होता. अचानक भिंत पडल्‍याने चिमुकल्‍याचा खेळतानचा आवाज अचानक दबला गेला. त्‍याला बाहेर काढेपर्यंत श्‍वास गुदमरल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झालेला होता. मालोद येथील तलाठी तेमरसिंग बारेला यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन पंचनामा केला. मृत बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी केले. वडील इमाम तडवी यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT