Jalgaon Police News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: ऑडिओ क्लिपनंतर पुन्हा एका पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल; चक्क तमाशात नाचत पैशांची ओवाळणी

ऑडिओ क्लिपनंतर पुन्हा एका पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल; चक्क तमाशात नाचत पैशांची ओवाळणी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पोलीस अधिकाऱ्याच्या एका समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्य वक्तव्याच्या ऑडिओ क्लिप व्‍हायरल झाली होती. या प्रकाराला काही दिवसच झाले असताना तमाशात नाचताना पोलीस (Police) कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Jalgaon Police News)

जळगाव पोलीस (Jalgaon Police) दलातील पोलीस अधिकाऱ्यांने मराठा समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्य वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्‍हायरल झाली होती. यानंतर या अधिकाऱ्यावर पोलीस प्रशासनाने निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच ऑडियो क्लिप व्हायरल करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल वरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. सदर घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा (Jalgaon) जळगाव पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी तमाशाच्या कार्यक्रमात नृत्य करताना व पैसे ओवाळतानाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) झाला आहे.

तो कर्मचारीही निलंबीत

जिल्हा पोलीस प्रशासनाने या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. भटू वीरभान नेरकर असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. दरम्यान व्हायरल होत असलेल्या ऑडिओ व्हिडिओ क्लिपमुळे जळगाव पोलीस दलाची मात्र चांगलीच नाचक्की होत असून या प्रकारामुळे पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT