बैलपोळा  
महाराष्ट्र

बैलपोळा : गावची चारशे वर्षाची अशी होती परंपरा मात्र

बैलपोळा : गावची चारशे वर्षाची अशी होती परंपरा मात्र

संजय महाजन

भुसावळ (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील वराडसीम (ता.भुसावळ) येथे बैल पोळा साजरा करण्याची ४०० वर्षाची परंपरा आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि अनोख्या पद्धतीने पोळा या गावात साजरा होतो. परंतु गावाची ही परंपरा दोन वर्षापासून मोडली असल्‍याने बैलपोळ्याला शांतता आहे. (jalgaon-news-varalsim-village-four-hundred-year-bailpoda-Bullfighting)

पोळा सणानिमित्त विविध ठिकाणी बैलांची मिरवणूक काढून पेाळा फोडण्याची पद्धत आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे यंदा पोळा सणाला काढण्यात येणारी बैलांची मिरवणुकीवर बंदी आहे. बैलांची मिरवणूक काढल्यास कारवाई करण्यात येईल. शेतकरी बांधवांनी घरीच बैलांची पूजा करून हा सण साजरा करावा. सार्वजनिक प्रसादाचे वाटप करू नये. कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. असे आदेश असल्याने यावर्षी या गावाची 400 वर्षाची परंपरा मोडली आहे.

अशी आहे परंपरा

भुसावळ तालुक्यातील वराडसीम गावात अनोख्या पद्धतीने पोळा साजरा केला जातो. या गावात जो मानाचा बैल असतो; त्या बैलाला पोळा फोडण्याचा मान दिला जातो. गावाच्या प्रवेश द्वारावर नारळाचे तोरण बांधले जाते. तसेच त्या प्रवेशद्वारावर एक अडीच फुटाची खिडकीतून त्या बैलाला उडी मारत पोळा फोडला जातो. या सणानिमित्त वराडसीम हे अख्खे गाव गोळा झालेले असते. कुणाचा बैल पोळा फोडणार याचीच शर्यत शेतक-यांमध्ये पाहायला मिळते.

शेतकऱ्याने उभारला स्वखर्चाने गाव दरवाजा

जवळपास चारशे वर्षांपूर्वी नारायण पाटील या शेतकऱ्याने स्वखर्चाने गाव दरवाजा उभारला आहे. पोळा फोडल्यानंतर बैलाच्या मालकाचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात येतो. परंतु दरवर्षी या सणावार दुष्काळाची छाया पसरली असते. परंतु दोनवर्षापासुन कोरोना या आजाराची छाया या सणावर पडली असल्याने शेतकाऱ्यांमधील उत्साह कमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT