वाचनालय 
महाराष्ट्र

स्वतःच्या राहत्या घरातच सुरू केले सार्वजनिक वाचनालय

स्वतःच्या राहत्या घरातच सुरू केले सार्वजनिक वाचनालय

Rajesh Sonwane

जळगाव : गावातील तरुणांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी वर्ग घडावे, सुशिक्षित पिढी घडावी असे आदर्श विचार समोर ठेऊन भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील वडगाव नालबंदी येथील माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते मोरसिंग राठोड यांनी त्यांच्या राहत्या घरातच सार्वजनिक वाचनालय (public library) व ग्रंथालय सुरू केले आहे. (jalgaon-news-vadgaon-village-started-a-public-library-in-his-own-house)

संत दगाबापू सार्वजनिक वाचनालय या नावाने वाचनालय सुरू करण्यात आले आहे. गावातील सार्वजनिक यात्रोत्सवानिमित्त ९ डिसेंबरला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी भैय्यासाहेब पाटील, नागराज पाटील, लोककला अभ्यासक कल्पतेश देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष रफीयोद्दीन शेख, सरपंच लिलाबाई राठोड, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण राठोड, भगवान निकुंभ, दिलीप शेंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. लोककला अभ्यासक कल्पतेश देशमुख यांनी पुस्तकांचा संच भेट दिला. तर भैय्यासाहेब पाटील यांनी पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

विविध ठिकाणाहून पुस्‍तके केली गोळा

मोरसिंग राठोड यांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वतःच्या खर्चातून तसेच विविध राजकिय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नेत्यांकडून त्यांनी पुस्तके गोळा केलेली असून अभ्यासासाठी उपलब्ध केलेली आहे. गावातील तरुणांनी वाचनालयाचा उपयोग करावा असे आवाहन मोरसिंग राठोड यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेरठ 'ब्लू ड्रम' प्रकरणात न्यायालयाचा मोठा निकाल; मुस्कान आणि साहिल दोषी, कधी सुनावली जाणार शिक्षा?

Mosquitoes : डासांना पळवून लावण्यासाठी लिबांच्या सालीचा भन्नाट उपाय, एकदा नक्की करून पाहा

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Housing Society : घरमालकांसाठी महत्त्वाचा नियम! फ्लॅट भाड्यानं देताना केली १ चूक, पुण्यात १३० जण अडचणीत; कायदा काय सांगतो? वाचा

Chanakya Niti : नातेवाईकांना 'या' 7 गोष्टी सांगाल तर रस्त्यावर याल! चाणक्यांचा गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT