Jalgaon News Gas Cylinder Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: गॅसचा अवैध वापर; वाहनात स्वयंपाकाचा गॅस भरताना दोघांना अटक

गॅसचा अवैध वापर; वाहनात स्वयंपाकाचा गॅस भरताना दोघांना अटक

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील अजिंठा चौफुलीजवळील बस थांब्याजवळ घरगुती गॅसचा काळा बाजार करून खासगी वाहनांमध्ये भरणाऱ्या दोन जणांवर अपर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने कारवाई केली. या प्रकरणी एमआयडीसी (Police) पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon News Gas illegal use)

एमआयडीसी परिसरातील (Jalgaon) जळगाव-भुसावळ रस्त्यावर असलेल्या अजिंठा चौकाजवळील बसथांब्याजवळ दोन जण अवैधरीत्या घरगुती गॅसचा (Gas) काळा बाजार करून खासगी वाहनांमध्ये भरत असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख, विजय सोनवणे, इमरान शेख, मुजफ्फर काझी, गोविंदा पाटील यांच्या पथकाने दुपारी दोनला छापा टाकून कारवाई केली. यामध्ये संशयित आरोपी जावेद खान सलीम खान (वय ४२) व मोहसीन ऊर्फ दत्ता शेख हमीद (२८, दोघे रा. मास्टर कॉलनी) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

सात सिलेंडर जप्‍त

त्यांच्याकडून भारत गॅसची सात (Gas Cylinder) सिलिंडर, तीन हजार ४६० रुपयांची रोकड आणि गॅस भरण्याचे साहित्य व मोटार असा एकूण २६ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात हवालदार विजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जावेद खान सलीम खान व मोसिन ऊर्फ दत्ता शेख हमीद यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT