Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: वडीलांना मुलाने पाहिले अन्‌ घरात आक्रोश; ट्रॅफिक वॉर्डनने संपविले जीवन

वडीलांना मुलाने पाहिले अन्‌ घरात आक्रोश; ट्रॅफिक वॉर्डनने संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव शहर वाहतूक शाखेत पूर्वी ट्रॅफिक वॉर्डन म्हणून कार्यरत असलेल्या ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत (Jalgaon) आत्महत्या केली. उमेश एकनाथ ठाकूर असे मृत तरुणाचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. (Maharashtra News)

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश एकनाथ ठाकूर (वय ३७) हा आई, वडील पत्नी व दोन मुलांसह श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ वास्तव्याला होता. बुधवारी (ता.२६) त्याने दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्यांचा मुलगा ओम याने पाहून आरडाओरड केल्यावर कुटूंबीयांना कळाले. उमेशचा मृतदेह पाहून पत्नी व आईने एकच हंबरडा फोडत आक्रोश केला.

आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍ट

शेजारी राहणाऱ्या तरुणांनी धाव घेऊन खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मृत घोषित केले. या वेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत उमेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहिण, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. प्राथमिक तपास पोलिस नाईक अल्ताफ पठाण करीत आहे. उमेशच्या आत्महत्येचे करण्याचे नेमके कारण समोर आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT