कापूस 
महाराष्ट्र

चाळीसगाव तालुक्‍यात हजारो हेक्टर क्षेत्र बाधीत; कापूस, मका, ज्वारी पिके वाया

चाळीसगाव तालुक्‍यात हजारो हेक्टर क्षेत्र बाधीत; कापूस, मका, ज्वारी पिके वाया

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव परिसरात झालेल्या पावसाने शेतशिवार पाण्याने तुडूंब भरली आहेत. काही शेतांमध्ये पिकांपेक्षा पाणी जास्त तुंबले आहे. दोन दिवस पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे काही प्रमाणात वाचलेली पीक देखील जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे हजारो हेक्टर पिकांचे क्षेत्र बाधीत झाले आहे. यात प्रामुख्याने कापूस, मका, ज्वारी, तूर आदी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

गेल्‍या महिनाभरात अर्थात ३१ ऑगस्ट ते २८ सप्टेंबर या एकोणतीस दिवसात तितुर नदीला चार महापुर आले. यात ३१ ऑगस्‍टच्या महापुरात तितुर नदी किनाऱ्यावरील शेतातील पीक वाहती झाली. काही शेतातील माती ठिबकचे पुर्ण साहित्य वाहून गेले. तर नदी किनाऱ्यावरील विहिरी या पुराच्या प्रवाहात पुर्ण बुजल्या गेल्या. तर या नंतर आलेल्या पुरामध्ये उरल सुरल सारच पुराबरोबर गेले.

उरल्‍या सुरल्‍या आशाही संपल्‍या

तालुक्‍यात २७ व २८ सप्‍टेंबरला झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे उरल्या सुरल्या शेतातील पीक जमीनदोस्त झाली आहे. कजगाव परीसरातील शेतामध्ये तीन ते चार फुट पाणी तुंबले असुन हे पाणी चोवीस तासानंतर देखील तसेच असल्याने पीक सडतील. शेतात तुंबलेले अथांग पाणी बांध फोडुन बाहेर काढण्यासाठी केविलवाणा प्रयत्न शेतकरी करत असल्याचे चित्र सर्वदुर नजरेस पडत आहे.

नुकसानग्रस्त भागाकडे यंत्रणेची पाठ

परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक पिके पाण्याखाली आली आहेत. शेतकर्याच्या तोंडी आलेला घास हीरावला असताना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोणत्याही राजकीय नेते आणि शासकीय यंञत्रणेतील अधिकार्यांनी साधी पाहणी देखील केली नाही. यामुळे शेतकर्यामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

SCROLL FOR NEXT