मोटारसायकलची चोरी 
महाराष्ट्र

जुगार खेळण्यासाठी मोटारसायकलची चोरी; दहा गाड्या पोलिसांनी केल्‍या हस्‍तगत

जुगार खेळण्यासाठी मोटारसायकलची चोरी; दहा गाड्या पोलिसांनी केल्‍या हस्‍तगत

संजय महाजन

जळगाव : शहरासह जिल्‍ह्‍यात दिवसाला सात वाहने चोरीला जात आहेत. वाहन चेारीचे वाढते गुन्हे आणि मुख्य बाजारपेठेतून वाहने चोरणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अटकेतील संशयीताने दहा वाहने काढून दिली. जुगार खेळण्यासाठी मोटारसायकलची चोरी करून त्‍या गहाण ठेवायचा.

जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दररोज वाहने चोरीला जात असून गेल्या महिनाभरात अनेक दुचाकींची चोरी झाल्याचे समोर आले आहे. दाखल गुन्ह्यांचा तपास करतांना शहर पोलिसांनी चेारट्यांच्या टोळीचा छडा लावला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या पथकातील प्रणेश ठाकूर,भास्कर ठाकरे अशा दोघांना दुचाकी चोरटा नेहमीप्रमाणे गोलाणी मार्केटमध्ये आल्याची पक्की खबर मिळाली.

दहा दुचाकी हस्‍तगत

त्यानुसार निरीक्षक ठाकूरवाड यांच्या पथकातील प्रणेश ठाकूर, भास्कर ठाकरे, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, संतोष खवले, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, किशोर निकुंभ, तेजस मराठे योगेश इंधाटे अशांनी सापळा रचून संशयित इब्राहीम मुसा तांबोळी (वय-२६ रा. तोंडापूर ता.जामनेर) याला गोलाणी मार्केटमधून अटक केली. त्याने १५ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामधील चोरीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. चोरीतील त्याच्या इतर साथीदारांची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत असून पंधरा मोटारसायकलींची कबुली त्याने दिल्यानंतरही इतर वाहनांबाबत चौकशी सुरु होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT