Murder 
महाराष्ट्र

अमळनेरात तरूणाचा खून; पैशाच्‍या वादातून घटना

अमळनेरात तरूणाचा खून; पैशाच्‍या वादातून घटना

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : अमळनेर येथील व्यापारी संकुलात मध्यरात्रीच्या सुमारास एका तरूणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली. यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. (jalgaon-news-The-beat-of-a-young-man-in-Amalnera-Incident-from-money-dispute)

अमळनेर येथील हशीमजी प्रेमजी संकुलात रात्री खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. शहरातील जुना पारधी वाडा येथील रहिवासी असणाऱ्या प्रकाश दत्तू चौधरी उर्फ बापू चौधरी (वय ३५) या तरूणाची गळा चिरून हत्या झाल्याचे सकाळी सफाई कामगारांना आढळून आले. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृत तरूणाची ओळख पटवून त्याच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. घटनेचे वृत्त कळताच एपीआय राकेशसिंग परदेशी, हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर, नगरसेवक नरेंद्र संदानशीव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

पैशांच्‍या वादातून खून

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता हा खून पैशांच्या वादातून झाल्याची माहिती मिळाली. कैलास पांडुरंग शिंगाणे याने हे कृत्य केल्याचे आढळून आले. खून केल्यानंतर शिंगाणे हा घटनास्थळावरून फरार झाला होता. तथापि, पोलिसांनी त्याला चोपडा येथून ताब्यात घेतले असून त्याला आज दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, एकाच कुटुंबातील तिघांसह ६ जणांचा मृत्यू

Terror Attack : जम्मू- काश्मीरमध्ये मोठा दहशवादी हल्ला, नाव विचारून गोळ्या झाडल्या; 2 जणांचा मृत्यू

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या वर्षभरातच गाशा गुंडाळला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT