Mobile blast 
महाराष्ट्र

गेम खेळतांना मोबाईलचा स्फोट; बालक जखमी

गेम खेळतांना मोबाईलचा स्फोट; बालक जखमी

Rajesh Sonwane

जळगाव : मोबाईलवर गेम खेळत असतांना हातातील मोबाईल हँडसेटच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. ही धक्कादायक घटना शेलवड (ता. बोदवड) येथे घडली असून यात दहा वर्षीय बालक जखमी झाला आहे. (jalgaon-news-ten-year-child-injurd-in-mobile-blast-playing-game)

चार्जिंग करत असतांना किंवा अधिक चार्जिंग झाल्यास मोबाईल हँडसेटचा स्फोट झाल्याच्या घटना घडत असतात. विशेष करून दीर्घ काळापर्यंत स्मार्टफोनचा वापर केल्याने त्याच्या बॅटरीचा स्फोट होऊन जखमी झाल्याचा घटना घडल्या आहेत. अशीच घटना शेलवड येथे घडली आहे.

जखमी बालक रुग्णालयात

सुसरी (ता. भुसावळ) येथील चेतन प्रफुल्ल पाटील (वय १०) हा बालक दिवाळीच्या सुटीनिमित्त शेलवड येथे मामाच्या घरी गेला होता. मोबाईलवर गेम खेळत असतांना हँडसेटमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला. यामुळे चेतनच्या हाताला इजा झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाइल वापरा जपून

सदर दुर्घटनेमुळे मोबाईलच्या वापरातील धोका हा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. यामुळे लहान मुलांच्या हातात मोबाइल देणे टाळावा. चार्जिंगला लावलेला असतांना शक्यतो मुलांच्या हातात मोबाईल द्यायला नको.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT