Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: पाच लाखांचे सागवानी लाकूड जप्त

पाच लाखांचे सागवानी लाकूड जप्त

साम टिव्ही ब्युरो

चोपडा (जळगाव) : मध्य प्रदेशातील धवली परीक्षेत्रातील धामण्या येथे अवैध पाच लाखांचे सागवान लाकूड महाराष्ट्र व मध्य प्रदेश वन विभागाच्या (forest Department) संयुक्त कारवाईतून जप्त करण्यात आले. यात दोन लाकूड कटाई मशिन, फर्निचर व कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. ही गुप्त माहिती (Yawal) यावल वन विभागाकडून मध्य प्रदेश (Madhya Pradesh) विभागाला देण्यात आली आणि संयुक्तपणे मोठी कारवाई करण्यात वन विभागाला मोठे यश मिळाले आहे. यात चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

सदर कारवाईत मध्य प्रदेशातील धामण्या येथील विनोद डोंगरसिंग, राजू दरबार, टोनीराम सुमला, सायसिंग पठाण यांना घरात असलेल्या लाखोंच्या अवैध सागवान लाकडाचा मुद्देमालासह पकडण्यात आले. घरात आढळून आलेला मुद्देमाल सेंधवा फॉरेस्ट डेपोत हलविण्यात आला आहे.

मध्‍य प्रदेशात बनविले जाते फर्निचर

सागवानी लाकूड हे महाराष्ट्रातून कापून ते चोरट्या मार्गाने मध्य प्रदेशात नेऊन त्या लाकडाचे फर्निचर करून सर्रासपणे विक्री केले जात असल्याचा प्राथमिक अंदाज वैजापूर येथील आरएफओ एस. एम. सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. या वेळी सहायक वनरक्षक प्रथमेश हडपे, आरएफओ एस. एम. सोनवणे, बी. के. थोरात, वैजापूरचे आय. एस. तडवी, वनपाल चुनिलाल कोळी, बाजीराव बारेला, संदीप भोई, गस्तिपथक वनरक्षक योगेश सोनवणे वनरक्षक, सचिन तडवी, आनंद तेली व निखिल पाटील, धवली रेंजर हेमंत प्रजापती, रजनेश त्रिपाठी, अर्जुनसिंग सेंधवा यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सत्ताधाऱ्यांच्या सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही अडवल्यात - उद्धव ठाकरे

Podi Idli Recipe: रोजच्या नाश्त्याला द्या हटके ट्विस्ट; बनवा साउथ इंडियन स्टाईल पोडी इडली

Akola : सोन्याचे विक्रमी दर; अकोल्यात मात्र कमी भावात सोनं, काय आहे नेमकं प्रकरण वाचा

New LIC Policy: LIC ने लाँच केल्या २ जबरदस्त योजना! कमी प्रिमियमवर मिळणार भरघोस परतावा; वाचा संपूर्ण माहिती

KDMC News : आशा सेविकांची दिवाळी होणार गोड, पालिकेकडून बोनस जाहीर, खात्यात पैसे कधीपर्यंत येणार?

SCROLL FOR NEXT